
दापोली : दापोली तालुक्यातील शिवनारी सुतारवाडी येथील उबाठा गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी दापोली मतदारसंघातील आमदार योगेश कदम यांच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन, शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. दरम्यान आमदार योगेेश कदम यांंई सर्वांचे पक्षात स्वागत करून पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी संजय म्हाप्रलकर, अमित दहिवलकर, अरुण दहिवलकर, बंधू पाथ्रटकर, अशोक म्हाप्रलकर, सचिन कासेकर, मंगेश लक्ष्मण दहिवलकर, सुनिल दहिवलकर, अनंत कासेकर, कमलाकर कासेकर, मंगेश पांडुरंग दहिवलकर, सुमित कासेकर, विनोद म्हाप्रलकर, वामन म्हाप्रलकर, विष्णू दहिवलकर, सुरज दहिवलकर, अजिंक्य दहिवलकर, ऋषिकेश पाथ्रटकर, श्री. पंकज देवघरकर, शैलेश कासेकर, नितीन कासेकर, समीर कासेकर, महेश दहिवलकर आदींनी प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार योगेश कदम म्हणाले, आजवर जशी मतदारसंघात आणि दापोली तालुक्यात विविध विकासकामे मार्गी लावली, त्याच पद्धतीने यापुढे देखील आपल्या सर्वांच्या साथीने तालुक्याचा कायापालट करण्यासाठी सदैव कार्यतत्पर भूमिका घेत राहील, असे आवाहन करून उपस्थित सर्वांशी संवाद साधत योग्य ते मार्गदर्शन केले.