भाजपा प्रणीत "सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कामगार संघटनेत" ४० कर्मचाऱ्यांचा प्रवेश

Edited by: दिपेश परब
Published on: February 05, 2024 13:27 PM
views 327  views

वेंगुर्ले : वेंगुर्ला आगार सेवा शक्ति संघर्ष कामगार संघाच्या २०२४ च्या नूतन कार्यकारणी निवडी निमीत्त साई मंगल कार्यालय, वेंगुर्ले येथे एस.टी. कामगारांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यात भाजपा प्रणीत "सेवा शक्ती संघर्ष एस. टी. कामगार संघटनेत" वेंगुर्ले आगारातील ४० कर्मचाऱ्यांनी  प्रवेश केला. 

यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा सेवा शक्ती संघर्ष कामगार संघ वेंगुर्ला आगार अध्यक्ष प्रसन्ना (बाळु) देसाई, भाजपा कामगार आघाडी अध्यक्ष सिंधुदुर्ग अशोक राणे, कामगार आघाडी कोकण प्रदेश अध्यक्ष लीलाधर भडकमकर, वेंगुर्ला आगार सेवानिवृत्त इलेक्ट्रीशन सुनील मठकर, सेवा शक्ति संघर्ष कामगार संघ विभागीय कार्याध्यक्ष संतोष भाट, विभागीय उपाध्यक्ष भरत चव्हाण, विभागीय सहसचिव महादेव भगत, विजयदुर्ग आगार सचिव रोहन शिंदे, वेंगुर्ला आगार सचिव दाजी तळवणेकर, कुडाळ आगार प्रसिध्दी प्रमुख समीर कदम, सावंतवाडी आगार कार्याध्यक्ष बाबली तुळसकर, सावंतवाडी आगार सहसचिव राजू ठाकूर, देवगड आगार निलेश शेट्ये, भाऊ सावळ इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी एस. टी. कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना प्रसंन्ना देसाई म्हणाले कि, आमदार गोपीचंद पडळकर व आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सेवा शक्ती संघर्ष कामगार संघटनेचे काम राज्यात उत्कृष्ट पणे सुरू  आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामगारांचे प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सुटत आहेत. त्यामुळेच विविध संघटनेत असलेले कर्मचारी भाजपा प्रणीत संघटनेत प्रवेश करत आहेत. राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार एस. टी. चे प्रश्न सोडविण्यात सकारात्मक निर्णय घेत आहेत. त्यामुळेच कामगारांमध्ये भाजपा प्रणीत सेवा शक्ती संघर्ष संघटनेबद्दल विश्वास निर्माण झाला .

यावेळी मनोज दाभोलकर, अनंत झोरे, विनायक दाभोलकर, योगेश प्रभुखानोलकर, रामचंद्र पालकर, महादेव भगत, निखिल भाटकर, सचिन सावंत, तेजस जोशी, मनोहर वालावलकर, मिलिंद मयेकर, संजय झोरे, आशिष वराडकर, आशीष धावडे, एस आर तम्हाणेकर, हेमंत बावकर इत्यादी संघटनेचे कर्मचारीउपस्थित होते.

यावेळी स्वप्नील रजपूत, सेजल रजपूत, समीर कांबळी,  वैभव मांजरेकर, आर बी बजरू, संजय मचे, शंभा सातजी, प्रकाश मोहिते, अक्षय येसाजी, संदीप माने, अनंत झोरे, मनोज दाभोलकर, विशाल पेडणेकर,  राहुल आरोलकर, गौरव राणे, प्रकाश कराड, व्ही. आर. नलावडे,  प्रवीण रेवणकर, अर्चना कांबळी, एस एच परब, आर पी पालकर, आर डी केदार, के एम अनाहोसुर, एस एस शेख, संजय मेस्त्री, पंढरी झोरे,  विकास बांदिवडेकर, पी एल चौघुले, पी बी कांबळे, एस ए रासम, एम पी सरमळकर, एस टी राऊळ, प्रमोद परुळेकर, एस एस कुरणे, साईनाथ दाभोलकर, डी डब्लु कोरगावकर, सुमन गोसावी इत्यादी कर्मचाऱ्यांनी सेवा शक्ति संघर्ष कामगार संघटनेत प्रवेश केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विनायक दाभोलकर यांनी केले.