दीपक केसरकरांची मोठी खेळी ; खासदारांना धक्का

थेट CM शिंदेंच्या उपस्थितीत 3 उपजिल्हा प्रमुख शिंदे गटात
Edited by: दिपेश परब
Published on: October 11, 2022 13:58 PM
views 1905  views

वेंगुर्ला : सिंधुदुर्गात शिंदे गट शिवसेनेत इनकमिंग सुरूच असून मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत वेंगुर्ला तालुक्यातील ३ शिवसेना उपजिल्हा प्रमुखांनी शिंदे गट शिवसेनेत प्रवेश केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार प्रतापराव जाधव  यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबई येथे  उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, सुनील डुबळे आणि बाळा दळवी यांचा यामध्ये समावेश आहे. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा प्रखर विचार पुढे नेण्याचे काम बाळासाहेबांची शिवसेना करित असल्यानेच आपण पाठींबा देण्याचा निर्णय घेत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

सिंधुदुर्गात शिवसेनेला खिंडार पाडत खासदार विनायक राऊत यांना धक्का देत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी ही मोठी खेळी खेळली आहे. यावेळी शिंदे गट शिवसेना तालुका प्रमुख नितीन मांजरेकर,  जि. प. सदस्य नितीन शिरोडकर, शहर प्रमुख सचिन वालावलकर, सावंतवाडी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, दोडामार्गचे प्रवीण गवस, परेश मुळीक आदी उपस्थित होते.