नाटळ ग्रामस्‍थ आयोजित ‘श्री राम’ रॅलीला उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद

Edited by:
Published on: January 23, 2024 12:43 PM
views 322  views

कणकवली : नाटळ ग्रामस्‍थांच्‍यावतीने राम प्रतिष्‍ठा सोहळ्याच्‍या निमित्ताने भव्‍य रॅली काढण्‍यात आली. नाटळ रामेश्‍वर मंदिर ते खांदारवाडी हनुमान मंदिरपासून राजवाडी मार्गे रामेश्‍वर मंदिर अशी रॅली काढण्‍यात आली. 

या रॅलीतील देखावा सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. राम - सिता, लक्ष्‍मण आणि हनुमान असा चालता-बोलता देखावा सादर करण्‍यात आला होता. यावेळी महिला, वृध्‍द, छोट्या मुलांचा समावेश होता. या रॅलीमध्‍ये दुचाकी, चार चाकी वाहनांनी सहभाग घेत ही रॅली भव्‍य करण्‍यात आली. यामध्‍ये प्रदीप सावंत, अभिषण सावंत, संजय सावंत, सचिन खांदारे, पद्‍माकर पांगम, विकास सावंत, अशोक सावंत, बबन सावंत, बबन डोंगरे, सचिन सावंत, बाळा सावंत, बाळा पटेल, संजय उर्फ आप्‍पा सावंत आदी उपस्‍थित होते.