कोकण कन्या एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड, रेल्वे वाहतूक विस्कळीत

राजापूर स्टेशनवरून नवीन इंजिन करण्यात आले उपलब्ध
Edited by: प्रतिनिधी
Published on: December 07, 2022 10:10 AM
views 378  views

वैभववाडी : इंजिनमध्ये बिघाड झाल्याने कोकण कन्या एक्सप्रेस कोकिसरे दरम्यान बंद पडली. त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही घटना आज सकाळी आठच्या दरम्यान घडली.

   मुंबईहून गोव्याकडे कोकण कन्या एक्सप्रेस जात असताना कोकिसरे रेल्वे फाटकापासून काही अंतरावर अचानक बंद पडली. इंजिनमध्ये बिघाड झाल्याने ट्रेन बंद पडली, अशी माहिती प्राप्त झाली आहे. रेल्वे बंद पडल्याने या मार्गावरील सेवा विस्कळीत झाली. राजापूर स्टेशनवरून नवीन इंजिन उपलब्ध करण्यात आले आहे. कोकण कन्या परत वैभववाडी प्लॅटफॉर्मवर नेण्यात येत आहे. कोकण कन्या बंद पडल्याने प्रवाशांचे  हाल झाले.