कणकवली मुख्य बाजारपेठ रस्त्यावरील अतिक्रमण हटविणार

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: June 14, 2025 15:13 PM
views 783  views

कणकवली : व्यापारी संघटना व पालकमंत्री यांच्या झालेल्या बैठकीनंतर नगरपंचायत प्रशासन व पोलीस यंत्रणेने तात्काळ कार्यवाहीचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पटवर्धन चौक ते पटकीदेवीपर्यंतच्या मार्गावरील वाहतुकीला अडथळा होणारे अतिक्रमण नागरिकांनी पुढील दोन दिवसांत स्वत: हून हटवावे, अन्यथा सोमवारपासून ते हटविण्यात येणार असल्याचा इशारा नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी गौरी पाटील व कणकवली पोलीस निरीक्षक मारूती जगताप यांनी दिला आहे.

पटवर्धन चौक ते पटकीदेवीपर्यंतच्या भागात वाहतुकीला होणाऱ्या अडथळ्यांच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम या मार्गावरील अतिक्रमण हटण्यिाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार नागरिक, व्यापारी यांनी रविवारपर्यंत येथील अतिक्रम, बोर्ड, शेडस् आदी स्वत:हून काढावेत. अन्यथा सोमवार १६ जूनपासून प्रशासनाकडून कार्यवाही करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान,  हे अतिक्रमण हटविल्यानंतर नगरपंचायतीच्या माध्यमातून शहरामध्ये एकदिशा मागार्ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तसेच सम, विषम तारखांना पार्किंग करण्याबाबतही नियोजन करून निर्णय घेणार असल्याचेसांगण्यात आले आहे.