
सिंधुदुर्गनगरी : शेख नावाच्या मुस्लिम समाजातील व्यक्तीकडून आमच्या सामायिक जमिनी मिळकतीमध्ये बेकायदेशीर अतिक्रमण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली जात असल्याबाबत. वेंगुर्ला तालुक्यातील दाभोली ग्रामस्थांचे पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे तसेच पालकमंत्र्यांचेही लक्ष वेधण्यात आले आहे.
दाभोली ग्रामस्थ स्मिता देऊ गावडे, चंद्रभागा शिरोडकर, संतोष शिरोडकर, सायली शिरोडकर, विनया गावडे, गणपत गावडे,एकता गावडे,देऊ गावडे, वैभव गावडे आदीच्या साह्याचे निवेदन पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.
दाभोली येथील जमिनी सामायिक स्वरूपाच्या असून त्या जमिनी कुणालाही विकलेल्या नाहीत. असे असून सुद्धा शेख नामक मुस्लिम समाजाच्या व्यक्तीने सुमारे 40 ते 50 लोकांचा समुदाय करून दाभोली येथील सामायिक जमीन मिळकतीमध्ये कब्जा करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यांना विचारणा केली असता त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी दिलेली आहे. जमीन मिळकतीमध्ये गेल्या दीड दोन वर्षांमध्ये बेकायदेशीर जमीन विक्रीचे व्यवहार झालेले आहेत दाभोली गावातील बेरोजगारीचा फायदा घेऊन येथील लोकांना आर्थिक आमिषे दाखवून तरुण पिढीला आपल्या दलालीच्या जाळ्यात ओडत आहेत.
वेंगुर्ले तालुक्यातील दाभोली गावामध्ये मुस्लिम समाजाला आमच्या जमिनी बेकायदेशीर विकून हिंदू-मुस्लिम तेढ निर्माण करणाऱ्या दलालांना आवर घालण्यात यावा. दाभोली गावातील मुस्लिमांच्या या बेकायदेशीर अतिक्रमणामुळे पंचक्रोशीतील गावामध्ये देखील भीतीने वातावरण निर्माण झाले आहे. सबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करून आम्हा स्थानिक शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.