
कणकवली : संपूर्ण जिल्ह्यात जि. प. अत्यारित 38 प्राथमिक आरोग्य केंद्र येतात. सदर काही इमारती सुस्थितीत असून काही इमारतींना किरकोळ दुरुस्ती आहे. उदा. दरवाजे, खिडक्या, पाईपलाईन काही ठिकाणी तुटलेली, ड्रेनेज तक्रारी, विद्युत तक्रारी, वायरिंग, मीटर, लाईट बोर्ड, अर्थिंग अशा गोष्टींमुळे लोकांना नाहक त्रास होत आहे व आपल्या खात्याची बदनामी होत आहे. रुग्ण कल्याण समितीला जे 25 हजार मिळतात त्यात औषधे व इतर खर्चास ते अपुरे पडतात त्यामुळे ही किरकोळ कामे दुर्लक्षित राहतात मोठ्या कामांना जि. प. कडून निधी दिला जातो. परंतु यासारख्या छोट्या कामांना निधी मिळत नाही; कारण हा खर्च किरकोळ असतो. त्यामुळे या कामांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार होत नाही. बऱ्याच ठिकाणी कर्मचारी राहत असलेल्या खोल्या नादुरुस्त स्थितीत आहेत. (पावसाळ्यात गळती, दरवाजा, खिडकी, इत्यादी ) त्यामुळे कर्मचारी यांना नाहक त्रास होतो.
या साऱ्याचा परिणाम त्यांच्या कामावर होत आहे काही ठिकाणी विद्युत यंत्रणा योग्य प्रमाणात नसल्याने रक्त तपासणी मशीन तसेच यासारख्या इतर मशीन धुळ खात पडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे रुग्ण असलेल्या खोल्यांचे दरवाजे, फॅन, लाईट, खिडकी इत्यादी तुटलेल्या स्थितीत आहेत त्यामुळे रुग्णांना त्रास होतो. या सगळ्या परिस्थितीचा रोष स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकारी यांच्यावर येत आहे. या प्रकारच्या अडचणी किती प्राथमिक आरोग्य केंद्रात आहेत याची पाहणी करावी. त्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करावेत.. या समस्या दूर करताना अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा. भविष्यात अशा किरकोळ गोष्टींमुळे शासनाची तसेच लोकप्रतिनिधी व स्थानिक पदाधिकारी यांची होणारी बदनामी सहन केली जाणार नाही याची नोंद घ्यावी. असा इशारा शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी दिला.