शेतकरी कामगार पक्षातर्फे रोजगार मेळावा संपन्न !

चित्रलेखाताई पाटील यांचा पुढाकार
Edited by: रुपेश रटाटे
Published on: April 12, 2023 18:09 PM
views 196  views

रायगड : शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने रायगड जिल्ह्यांमधील आलिबग, मुरुड, रोहा या तालुक्यामध्ये  रोजगार मेळावा संपन्न झाला. 

तीन  दिवस चालू असलेल्या या मेळाव्यात युवा तरुण तरुणींनी यात मोठ्या संख्येने आपला सहभाग घेतला होता .

विविध क्षेत्रातील शिक्षण घेतलेल्या तरुण-तरुणींसाठी हा मेळावा खूप महत्वाचा ठरला. यात प्रामुख्याने या मेळाव्यात नर्सिंग, फायनान्स, रिटेल सेल्स, बँकिंग, इन्शुरन्स, टेलिकॉम, आयटी बिपिओ, केपिओ फाम, बी.ए,बी कॉम, एम कॉम, एम ए सी, आयटीआय यांचा समावेश होता.  

ग्रामीण भागातील ८ वी, 10 वी, 12 वी साठी सुध्दा रोजगाराची संधी या रोजगार मेळाव्यात उपलब्ध करून देण्यात आली.    

या मेळाव्यासाठी रायगड जिल्हा शेतकरी पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा ताई पाटील यांचे महत्वाचे योगदान राहिले. रोहा तालुक्यातील अमोल शिंगरे, हेमंत ठाकूर, परेश म्हात्रे, महादेव शाबसकर, संतोष दिवेकर इतर युवा कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.