
कुडाळ : कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाच्या झालेल्या निवडणुकीची मतमोजणी उद्या शनिवार 23 नोव्हेंबर रोजी तहसीलदार कार्यालय कुडाळ येथे होणार आहे यासंदर्भात मतमोजणीसाठी असलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी घेतले.दरम्यान कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक झाल्यानंतर आता सर्वांचे लक्ष निकालाकडे लागून राहिले आहे. या निकाल प्रक्रियेमध्ये प्रशासनही सज्ज झाले आहे त्या दृष्टीने सर्व प्रकारची खबरदारी प्रशासन घेत आहे. असे असताना मतमोजणी कशाप्रकारे केली जाणार आणि या मतमोजणी मध्ये कोणत्या समस्या आल्यावर त्या कशा सोडवल्या जाव्यात यासंदर्भात निवडणूक निर्णय अधिकारी ऐश्वर्या काळुसे यांनी सर्व मतमोजणीसाठी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण कुडाळ येथे घेतली यावेळी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.