सिंधुदुर्ग जिल्ह्याशी भावनिक नाते : नारायण राणे

Edited by: कृष्णा ढोलम
Published on: May 05, 2024 13:25 PM
views 208  views

मालवण : आपला भारत जागतिक स्तरावर प्रगतशील, आत्मनिर्भर आणि विकसित व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रयत्नशील आहेत. 140 कोटी जनतेच्या सुख समाधानासाठी ते प्रयत्नशील आहेत. जन सामान्यांच्या हिताच्या 54 योजना त्यांनी आणल्या. जनतेच्या पाठींब्यावर तिसऱ्यावेळी ते पंतप्रधान होत असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातून आशीर्वाद देत पंतप्रधानांचे हात बळकट करा. अब की बार चारसो पार होत असताना त्यात आपलाही सहभाग असू द्या. असे आवाहन केंद्रीयमंत्री तथा भाजपा महायुतीचे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवार नारायण राणे यांनी सुकळवाड येथे बोलताना केले. 

पेंडूर सुकळवाड जिल्हा परिषद मतदार संघ महायुतीची जाहीर सभा सुकळवाड येथे पार पडली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, शिवसेना कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, उपजिल्हा प्रमुख विश्वास गावकर, तालुकाप्रमुख राजा गावकर, तालुकाप्रमुख महेश राणे, मनसे उपजिल्हा प्रमुख गणेश वाईरकर, संतोष साटविलकर, सुकळवाड सरपंच युवराज गरुड, प्रकाश पावसकर, माधुरी बांदेकर, सुमेधा पाताडे, अजिंक्य पाताडे, स्वप्नील गावडे, सागर कुशे, चेतन मुसळे, बाबुराव मसुरकर, किशोर पेडणेकर, अजय मयेकर, भाई राणे, जगदीश चव्हाण, राजन माणगावकर, जगन्नाथ आजगावकर, अर्जुन आटक, संजय नाईक, यासह नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात स्वागृही परतलेले माजी उपासभापती प्रसाद मोरजकर, पेंडूर माजी सरपंच दादा वायंगणकर यासह माजी पंचायत समिती सदस्या भाग्यता वायंगणकर, सुकळवाड ग्रामपंचायत सदस्य प्रणीला पाताडे, जान्हवी पालकर यासह अन्य उपास्थित होते. 

ना. नारायण राणे म्हणाले, कोकणातील तरुणाई इंजिअर डॉक्टर व्हावे म्हणून मेडिकल कॉलेज, इंजिअर कॉलेजची स्थापना केली. ओरोस येथे टेक्निकल सेंटरची उभारणी होत आहे. दोडामार्ग आडाळी येथे देशातील पाहिला मेडिसिन इक्विपमेंट तयार करणारे कारखाने येऊ घातले आहेत. स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, कोकणाच्या सर्वांगीण विकासाला गती मिळावी यासाठी प्रयत्न सुरु आहेत. जिल्ह्यात विमानतळ मंजूर केले, रेडी पोर्ट आणले, अनेक विकासप्रकल्प् झाले. मात्र उबाठा विरोधकांनी केवळ विकासकामांना विरोध व पैसे खाण्याचेच काम केले. निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यात येऊन केवळ टिका टिप्पणी करण्याचे काम ठाकरे गटाने सुरु ठेवले आहे. मात्र येथील विकासात यांचे योगदान काय ? अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना कोकणाला काय दिले असा रोखठोक सवाल राणे यांनी उपस्थित केला. खरी शिवसेना बाळासाहेबांची. ती वाढविण्याचे काम आम्ही केले. आता एकनाथ शिंदे ती पुढे घेऊन जात आहेत. असेही राणे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित जनसमुदाय माता भगिनींचे आभार व्यक्त करताना शिवसेना पदाधिकारी बबन शिंदे यांचे विशेष कौतुक केले. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याशी भावनिक नाते 

सिंधुदुर्ग जिल्ह्याशी भावनिक नाते आहे. येथील जनतेला मी माझे कुटुंब मानतो. मी नेहमीच जनतेचा सेवक म्हणून काम केले. सेवा करत असताना जिल्ह्यात सुबकता आणावी यासाठी माझे प्रयत्न राहिले. केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यात गतिमान विकासासोबतच जास्तीत जास्त रोजगार निर्मितीसाठी आपले प्रयत्न राहतील. कोकणच्या प्रगतीसाठी आपल्या सर्वांची साथ नेहमीच राहिली. यापुढे तशीच साथ देत सेवा करण्याची संधी द्या. असेही ना. नारायण राणे उपस्थितांशी संवाद साधताना व्यक्त झाले.