नव्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबांचेचं नाव द्या !

परिट समाजाच्यावतीने प्रशासनाकडे मागणी
Edited by: भगवान शेलटे
Published on: December 20, 2023 15:54 PM
views 99  views

सावंतवाडी : सावंतवाडी नगरपरिषदेच्या माध्यमातून नव्याने उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलाला संत गाडगेबाबा यांचे नाव देण्यात यावे तसेच त्यांचा पूर्णकृती पुतळा उभारण्यात यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा परिट समाजाच्यावतीने प्रशासनाकडे करण्यात आली. दरम्यान इमारत ही संस्थानकालीन आहे. त्या ठिकाणी स्वतः गाडगेबाबांनी येऊन प्रबोधन केले होते. त्याची आठवण म्हणून या इमारतीला हे नाव देण्यात आले होते. त्यामुळे पुन्हा एकदा तेच नाव देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा परीट समाज जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर, दिपाली भालेकर, राजेंद्र भालेकर, दयानंद रेडकर, लक्ष्मण बांदेकर, योगेश आरोलकर, संजय होडावडेकर, किरण वाडकर, सुरेश पन्हाळकर, कृष्णा मडवळ, भगवान वाडकर, रितेश चव्हाण, रवींद्र होडावडेकर, जितेंद्र मोरजकर,मधुकर मोरजकर संदीप बांदेकर, प्रतीक्षा मोरजकर सुरेखा मोरजकर, राजश्री होडावडेकर, अनुजा होडावडेकर, शर्वरी होडावडेकर ,इंद्रायणी होडावडेकर,सुधा बांदेकर, प्रीतमा मराठे, पुंडलिक मराठे सुरेश चव्हाण, संदीप भालेकर ,नीला वाडकर, देवयानी मडवळ, भावना वाडकर आदी उपस्थित होते.