राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्त वक्‍तृत्‍व - रांगोळी स्पर्धा !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 20, 2024 09:25 AM
views 157  views

कणकवली : १४ व्‍या राष्‍ट्रीय मतदार दिनानिमित्‍त तहसिलदार कार्यालय कणकवली, कणकवली कॉलेज कणकवली व विद्यामंदीर प्रशाला, कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने २४ जानेवारी २०२४ रोजी निवडणूक आयोगाने दिलेला  "वोट जैसा कुछ नहीं, वोट जरुर डालेंगे हम“  हा विषय घेऊन तालुका स्‍तरावर वक्‍तृत्‍व स्‍पर्धा व रांगोळी स्‍पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 

स्‍पर्धा शालेय गट (८ वी ते १० वी) व खुला गट (यामध्‍ये अट नाही) अशा दोन गटांमध्‍ये घेण्यात येणार असून स्‍पर्धेमध्‍ये सहभागी होणारे स्‍पर्धक मराठी, हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा अवलंब करु शकतील. वक्‍तृत्‍व स्‍पर्धा ही दि. २४ जानेवारी २०२४ रोजी सकाळी १० वाजता कणकवली कॉलेज, कणकवली येथे तर रांगोळी स्‍पर्धा दि. २४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी २ वाजता विद्यामंदीर प्रशाला, कणकवली येथे सुरू होईल. तरी सदर स्‍पर्धामध्‍ये जास्‍तीत जास्‍त विद्यार्थी व नागरीकांनी सहभाग घ्‍यावा असे आवाहन उपविभागिय अधिकारी, कणकवली  जगदीश कातकर व तहसिलदार कणकवली श्री. दीक्षांत देशपांडे  यांनी केले आहे. 

वक्‍तृत्‍व स्‍पर्धेमध्‍ये भाग घेऊ इच्छित स्‍पर्धकांनी दि. २३ जानेवारी २०२३ रोजी पर्यंत आपली नांवे नोंदविणेची असून (खुल्‍या गटासाठी) श्री. विजय सावंत, प्राध्‍यापक कणकवली कॉलेज कणकवली मो.नं. ९४२३८३३२३७ (शालेय गटासाठी) श्रीम. नेहा सावंत, शिक्षक, मो.नं. ९४२११४८०५३ व श्रीम. वैभवी हरमळकर, शिक्षक मो.नं. ९४२३२४९१८० विद्यामंदीर प्रशाला, कणकवली यांचेशी संपर्क साधावा. तसेच रांगोळी स्‍पर्धेमध्‍ये भाग घेऊ इच्छित  स्‍पर्धकांनी श्री. प्रसाद राणे, शिक्षक  मो.नं. ९४२२३७४१२७ विद्यामंदीर प्रशाला, कणकवली यांचेशी संपर्क साधावा.