जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 18, 2023 18:30 PM
views 84  views

सिंधुदुर्गनगरी : प्रधानमंत्री मातृवंदना योजनेंतर्गत लाभार्थींचे प्रमाण वाढविण्यासाठी 18 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. तरी जिल्ह्यातील पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सई धुरी यांनी केले आहे. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्यादृष्टीने गर्भवती माता व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणेत्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी व जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य सुधारावेमातामृत्यु व बालमृत्यु दरात घट होऊन तो नियंत्रित राहावायासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरु केली आहे.

मिशन शक्तीच्या मार्गदर्शक सुचनेनुसार राज्यात प्रधानमंत्री मातृवंदना 2.0 पोर्टल सुरु झालेले आहे. या योजनेचा जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्रांअंतर्गत 30 नोव्हेंबर 2023 ते 1 डिसेंबर 2023 या कालावधीत ऑनलाईन लाभार्थी नोंदणी अभियान राबविण्यात आलेले होते. या कालावधीतील कामगिरी प्रभावी होती. परंतु अभियानानंतर नोंदणीच्या संख्यत घट झाल्याचे दिसुन येत आहे. नोंदणीची स्थिती सुधारण्यासाठी दिनांक 18 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीत एक आठवडा PMMVY नोंदणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.


प्रधानमंत्री मातृवंदना योजना शहरी व ग्रामीण भागामध्ये लागु करण्यात आली असून या योजनेंतर्गत शासनाने अधिसुचित केलेल्या संस्थेत नोंदणी केली असेल अशाच पात्र महिलांना या योजनेचा लाभ पहिल्या जिवीत अपत्यासाठी रु.5000/- दोन टप्प्यात ऑनलाईन पध्दतीने लाभार्थीच्या बँक खातेवर देण्यात येतो. तसेच 1 एप्रिल 2022 नंतर दुसरे अपत्य मुलगी असल्यास रु.6000/- चा लाभ ऑनलाईन पध्दतीने लाभार्थीच्या बँक खातेवर देण्यात येतो. ही योजना शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळून इतर सर्व मातांना देय आहे. यात सहभागासाठी काही अटी असुन त्या पूर्ण करणाऱ्या मातांचा सहभाग योजनेत केला जातो.


पहिले अपत्य, पहिला हप्ता, मासिक पाळीच्या शेवटच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत राज्य शासनाकडून मान्यता प्राप्त आरोग्य संस्थामध्ये गरोदरपणांची नोंदणी आणि किमान एक प्रसुती पूर्व तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. रक्कम रु. 3000/-, दुसरा हप्ता, जन्म नोंदणी प्रमाणपत्र, बालकास बीसीजी, ओपीव्ही, डीपीटी, आयपीव्ही आणि हिपॅटायटीस- बी च्या मात्रा  अथवा समतुल्य लसीकरण (प्राथमिक लसीकरण चक्र पुर्ण) करणे आवश्यक आहे. रुक्कम रु. 2000/-, दुसरे अपत्य (मुलगी असल्यास), एक हप्ता, बाळाच्या जन्मानंतर (जर एखाद्या लाभार्थीस तिच्या दुसऱ्या गरोदरपणात एकापेक्षा जास्त (जुळे/तिळे/चार) अपत्य झाली असतील व त्यामध्ये एक किंवा अधिक मुली असतील, तर तिला PMMVY 2.0 नियमांनुसार दुसऱ्या मुलीसाठीचा लाभ मिळेल.) 6000/-

 

योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे (कोणत्याही एका ओळखपत्राच्या पुराव्याची प्रत जोडणेबाबत) ज्या महिलांचे निव्वळ कौटुंबिक उत्पन्न प्रतिवर्ष रु. 8 लाख पेक्षा कमी आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या महिला. ज्या महिला अंशत: (40 टक्के) किंवा पूर्ण अपंग आहेत (दिव्यांग जन). बीपीएल शिधापत्रिकाधारक महिला. आयुष्यमान भारत अंतर्गत प्रधानमंत्री जन आरोग्य (PMJAY) अंतर्गत महिला लाभार्थी. ई-श्रम कार्ड धारण करणाऱ्या महिला.किसान सन्मान निधी अंतर्गत लाभार्थी महिला शेतकरी. मनरेगा जॉब कार्ड घेतलेल्या महिला. गर्भवती आणि स्तनपान करणाऱ्या अंगणवाडी सेविका (AWW) अंगणवाडी मदतनीस (AWHS) आशा कार्यकर्ती (ASHAS).जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी किशोर तावडे, मुख्य कार्यकारी प्रजित नायर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सई धुरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. रमेश कर्तस्कर यांच्याकडून करण्यात येत आहे.