
मालवण : पोलीस पाटील भरती प्रक्रियेत अंतिम निवड होऊन पात्र ठरलेल्या व नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत असलेल्या मालवण तालुक्यातील उमेदवारांनी भाजपा नेते निलेश राणे यांची भेट घेतली. आमच्या भावना शासनाकडे पोहचवून आम्हाला लवकरात लवकर नियुक्ती मिळवून द्या. अशी मागणी उमेदवारांच्या वतीने करण्यात आली. दरम्यान, अंतिम निवड झालेल्या पात्र उमेदवारांना लवकरात लवकर नियुक्ती पत्र मिळवून देण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्नशील राहू. असे निलेश राणे यांनी उपस्थितांना आश्वासित केले. यावेळी सर्व उमेदवारांनी निलेश राणे यांचे आभार व्यक्त केले.
मालवण येथील निलरत्न निवासस्थानी निलेश राणे यांची भेट घेत नियुक्ती पात्र उमेदवारांनी चर्चा केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, महेश वरक, संतोष गावकर तसेच निवडपात्र उमेदवार सुनील खरात, समीर परब, दशरथ गोवेकर, पंकज आंगणे, संदीप शिंदे, भिकाजी परब, संग्राम कासले यासह महिला व पुरुष असे सुमारे 60 ते 70 उमेदवार उपस्थित होते.