हत्ती प्रश्न सर्वपक्षीय, नाडकर्णी यांनी भाजपचा साज चढवू नये

विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई यांचा सल्ला | हिम्मत असेल तर भाजपच्या लेबलवर आंदोलन करावे
Edited by: संदीप देसाई
Published on: August 31, 2023 15:08 PM
views 166  views

दोडामार्ग :  हत्ती प्रश्नावर कोणी काय केले हे तिलारी खोऱ्यातील जनतेला माहिती आहे या भागात ग्रासरूटवर जर कोणी काम केले तर एकमेव दीपकभाई केसरकर यांनीच. दीपकभाई हे चालता बोलता कधी भेट घेत नाहीत तर हितगुज करुन प्रश्न सोडवतात. भाजपचे एकनाथ नाडकर्णी नाहक राजकारण का करू पाहतात?  मंत्री केसरकर यांनी बैठक आयोजित केली हे कोणी तज्ञाने सांगण्याची गरज नाही आणि जे मुद्दे मुंबईत चर्चेत आले ते यापूर्वीच  ना. केसरकर आणि वनविभाग यांच्यासोबत ठरले होते. केर येथे अन्नत्याग आंदोलन समोर आले तेव्हा त्याचे लेखी पत्र दिले होते ते आम्ही दाखवू शकतो. तिलारी खोऱ्यातील शेतकऱ्यांची हत्ती पकड मोहीम ही एकमेव मागणी होती आणि त्यावर वनमंत्री भूमिका घेतील असे अपेक्षित होते कारण इतर गोष्टी या भागात सुरु आहेत त्याची माहिती श्री. नाडकर्णी यांनी घ्यावी उगाचच ना. केसरकर यांच्यावर टीका करू नये. भाजपचे लेबल लावण्याअगोदर भाजपच्या मंत्री महोदयांनी किती वेळा प्रत्यक्ष नुकसान पाहिली हे बघावं सत्ता आहे त्याचा उपयोग हत्ती हत्ती पकड मोहिमेसाठी करावा उगाचच राजकारण करून स्थानिकांच्या मनात राजकीय भावना निर्माण करू नयेत असे आपले मतं असल्याचे प्रेमानंद देसाई म्हणाले.

गेल्या एक मार्च पासून या वर्षांत हत्तीबाधीत क्षेत्रात वनविभाग सोबत उपोषण, आंदोलन, बैठका होत आहेत.या परिसरातील सर्व आजीमाजी सरपंच यांनी एकत्रित येऊन आंदोलन चा इशारा दिलेला होता. त्यावर सावंतवाडी उपवनसंरक्षक यांचे कार्यालयात, दोडामार्ग वनविभाग च्या कार्यालयात ३१मार्च पुर्वी बैठकीत वनविभाग ने काल झालेल्याच चर्चेत झालेल्याच गोष्टींवर आश्वासन दिल्यानंतर आंदोलन स्थगित केलेले होते.१० ऑगस्ट ला झालेले आंदोलन हे सर्व पक्षीय आंदोलन होते त्यावर मा.ना.दिपकभाई केसरकर यांनी वनमंत्री मुनगंटीवार साहेब यांचेशी चर्चेत ठरल्यानुसार आंदोलन स्थगित करून २५ ऑगस्ट पुर्वी मंत्रालय येथे बैठक आयोजित करण्याच्या हमीवर आंदोलन सर्वांनी स्थगित केले होते आणी म्हणूनच २४ ऑगस्ट ला मा.ना.मुनगंटीवार साहेब यांनी बैठक आयोजित केली होती ती बैठक पालकमंत्री यांनीच रद्द करून राजकारण केले असे नाडकर्णी यांना सुचवायचे आहे का?हे प्रथम जाहीर करावे.

२४ तारीखची बैठक रद्द करून २९ तारीख ला ठेवण्यात आली असे वनमंत्री यांचे स्विय सहाय्यक यांनी आधीच कळविले होते मग १० मिनिटांसाठी घोटगेवाडी त आणण्याचं राजकारण भाजपने केलेय व सर्वसामान्य शेतकऱ्यांकडून झालेला उठाव भाजप च्याच पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आलाय असं सुचित करायच असेल तर तसं सांगावे. मग आम्हीपण शिवसेना म्हणून आंदोलनात उतरतो. मग त्याची जबाबदारी भाजप ने घ्यावी. फुकटात श्रेयवादासाठी उठाठेव करू नये .हिम्मत असेल तर भाजप च्याच लेबलवर आंदोलन करावे आम्ही सज्ज आहोत असा सल्ला प्रेमानंद देसाई शिवसेना सावंतवाडी मतदारसंघ प्रमुख यांनी दिला आहे