दोडामार्गात हत्ती पकड मोहिमेसाठी सरपंच सेवा संघाचा बेमुदत उपोषण एल्गार

फ़ॉरेस्ट कार्यालयासमोर बेमुदत उपोषण | तालुक्यातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते उतरले मैदानात
Edited by:
Published on: March 07, 2025 15:40 PM
views 205  views

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील हत्ती उपद्रव रोखण्यासाठी तातडीने हत्ती पकड मोहीम व प्रतिबंधात्मक उपाय योजना करण्याकडे राज्यसरकार वन खात्याने दुर्लक्ष केल्याने जनतेचा जिव्हाळ्याचा हा प्रश्न सोडवण्यासाठी दोडामार्ग तालुक्यातील सरपंच संघटना आता आक्रमक झाली आहे. शुक्रवारपासून संघटनेचे पदाधिकारी, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते यांनी हत्तीपकड मोहिमेसाठी बेमुदत उपोषण आंदोलन सुरु करत वनखात्याच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला आहे. हत्तीबाधित तिलारी खोरे व  तालुक्यातील सरपंच, स्थानिक ग्रामस्थ लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आदींसह मालवण तालुक्यातीलही काही सरपंच या आंदोलनात सहभागी झाले आहेत .

 मागण्या करून, निवेदन देऊन, आम्ही आता कंटाळलो आहोत. त्यामुळे आता आश्वासने नको, प्रत्यक्ष कार्यवाही व्हावी आणि जोवर प्रत्यक्ष हत्ती पकड मोहीम प्रक्रिया आता हाती घेतली जात नाही तोपर्यंत या आंदोलनातुन सरपंच माघार घेणार नाही असं स्पष्ट इशारा या आंदोलनाचे नेतृत्व करणारे सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस व आंदोलनात सहभागी सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थांनी दिला आहे.

 या आंदोलनात हेवाळे सरपंच साक्षी देसाई,  सरपंच सुजल गवस, सौ. छाया धरणे, सरपंच आपा गवस, प्रवीण गवस, घोडगेवाडी उपसरपंच रत्नकांत कर्पे,. उपसरपंच राजन गवस, समिर देसाई, फळबागायतदार संघांचे संजय देसाई, माजी सरपंच राजाराम देसाई, आनंद शेटकर, युवा सेनेचे मदन राणे, संदेश राणे, ओलविन लोबो, सुशांत नाईक, वृषभ देसाई, संजय गवस, गणपत देसाई आदी सहभागी झाले आहेत.