कणकवलीत दिवाळीच्या तोंडावर वीज पुरवठा खंडित

व्यापाऱ्यांसह ग्राहक हैराण
Edited by:
Published on: November 09, 2023 17:02 PM
views 211  views

कणकवली : दिवाळी सणाच्या तोंडावरच कणकवली शहर व अन्य भागातील विद्युत पुरवठा खंडित झाल्याने व्यापाऱ्यांसह ग्राहक हैराण झाले आहेत. गेली दोन ते दिवस अचानक वीज गायब होते व काही तासांनी येते याबाबतचे कोणतेही कारण सांगितले जात नाही. अचानक विज गायब होत असल्याने कणकवलीकर त्रस्त झाले आहेत. सणासुदीच्या तोंडावर अशा प्रकारे वीज पुरवठा खंडित होत असेल तर व्यापारी व ग्राहक विद्युत विभागाबद्दल नाराजी व्यक्त करत आहेत.