विश्वासात न घेताच जमिनीत विद्युत पोल | बागायतदार मंगेश चिले यांचं उपोषण

Edited by: विनायक गावस
Published on: January 27, 2024 06:41 AM
views 157  views

सावंतवाडी : विरोध असतानाही विज वितरण कंपनीने विश्वासात न घेताच जमिनीत विद्युत पोल उभारून वीज वाहिनी नेली आहे. त्यामुळे विद्युत खांबासह ही वीज वाहिनी न हटवल्यास २६ जानेवारी रोजी सावंतवाडी वीज वितरण कार्यालयासमोर आमरण उपोषण छेडण्याचा इशारा दिल्याप्रमाणे ओटवणे येथील प्रगतशील बागायतदार मंगेश विठ्ठल चिले यांनी उपोषण छेडलं. मंगेश चिले यांची ओटवणे गवळीवाडी नजीक बावळाट येथे सर्वे नं. २०८ मध्ये जमीन आहे. या जमिनीतून विजवाहिनी नेतानाचे काम सुरू असताना मंगेश चिले यांनी अटकाव केला होता. त्यानंतर हे काम बंद होते. मात्र त्यानंतर जमीन मालक मंगेश चिले यांना विश्वासात न घेताच तसेच ते घटनास्थळी नसल्याची संधी साधुन वीज वितरण कंपनीने विद्युत खांब उभारून थ्री फेज लाईन उभारली.

याबाबत मंगेश चिले यांनी वीज वितरण कंपनीच्या माडखोल कार्यालयातील शाखा अभियंता पृथ्वीराज चव्हाण यांना याचा जाब विचारताच उलट त्यानी उडवा उडवीची उत्तरे दिली.  तसेच तुम्ही तुमची जमीन सिद्ध करा आणि तुम्ही काय ते करा विजवाहिनी तसेच राहणार असे सांगून उद्धट वागणूक दिली. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या या अरेरावी विरोधात तसेच अन्यायाविरोधात मंगेश चिले यांनी उपोषण सोडण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे शुक्रवारी त्यांनी महावितरण समोर उपोषण छेडलं.