होडावडे गावात विजेचा लपंडाव

Edited by: विनायक गावस
Published on: July 06, 2023 17:08 PM
views 90  views

सावंतवाडी : वेंगुर्ला तालुक्यातील होडावडे गावात सध्या सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. गावातील विद्युत वाहिनीवरील काही ठिकाणी  झाडाच्या फांद्या लाईनला लागून सतत पुरवठा खंडित होत आहे. संबंधित वीजमहामंडळ अधिकारी व कर्मचारी यांनी यांची तात्काळ दखल घेऊन या झाडाच्या फांद्या तोडाव्या. जर न तोडल्यास व विद्युत पुरवठा सुरळीत न केल्यास ग्रामस्थ येऊन वेंगुर्ला येतील कार्यालयात येऊन  अधिकाऱ्यांना घेराव घालतील असा इशारा गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसरपंच प्रसाद दळवी व प्रसाद परब यांनी ग्रामस्थांच्या वतीने दिला आहे . तसेच तारा तुटून जिवीत हानी झाल्यास विद्युत् महामंडळ जबाबदार राहणार असा इशारा दिला आहे.

यापूर्वी यापूर्वी वेगवेगळ्या मंडळाच्या वेंगुर्ली येथील अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते की होडावडे गावातील विद्युत पुरवठा सुरळीत करावा तसेच विद्युत वाहण्यावरील झाडे साफ करून विद्युत पुरवठा सुरू ठेवा असे निवेदन देण्यात आले होते. कारण वारंवार रात्रीच्या वेळी लाईट जात असते.

संबंधित वीजवितरण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेऊन होडावडे गावातील वीज पुरवठा सुरळीत करावा तसेच  स्ट्रीट लाईटच्या लाईन वर  काही ठिकाणी झाडे येऊन झाडाच्या फांद्यावर लागले आहेत. त्या तात्काळ थोडाव्या तसेच महत्त्वाच्या हेवी लाईनवर पण झाडाच्या फांद्या येऊन लागले आहेत .त्या पण तोडलेल्या नाहीत. त्यामुळे पावसाळी हंगामात शेतकऱ्यांना तसेच ग्रामस्थांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच विज बिल वेळेत भरून पण विद्युत महामंडळाकडून चांगल्या प्रकारे सहकार्य केले जात नसल्याने ग्रामस्थातून नाराजी व्यक्त केली जात आहे.