
दोडामार्ग : पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन करताना मणेरी कुबल वाडी येथील मणेरी रेसिडेन्सीच्या गेटला सोहम संजय कुबल व संजय कुबल या बाप लेकाला विजेचा शॉक लागल्याने ते जखमी झाले. भर वस्तीत कोणताही इशारा फलक न लावता लोकांच्या जीविताशी खेळणाऱ्या रेसिडेन्सी मालकावर दोडामार्ग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती आशिकी बुधवारी गणेश चतुर्थीच्या पाचव्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करताना सायंकाळी मणेरी कुबल वाडी येथील ग्रामस्थ आपल्या गणपती विसर्जन मिरवणुकीत गुंग होते ते मिरवणूक काढत काढत मणेरी रेसिडेन्सी या ईमारतीकडे पोहचले. गणपतीची मिरवणूक सोहम कुबल रेसिडेन्सीच्या सौरक्षक कठाद्याकडे उभा राहून बघत होता अचानक त्याचा हात संरक्षक कठाड्याला लागला आणि त्याला विजेचा मोठा धक्का बसला आणि तो मोठ्याने जीव वाचवण्यासाठी ओरडला हे पाहून त्याचे वडील संजय कुबल त्याला वाचविण्यासाठी धावून गेले आणि त्यांना ही विजेचा धक्का लागला आणि दोघेही जमिनीवर कोसळले वेळ आली होती. मात्र, काळ आला नव्हता याचे प्रत्येय पाच दिवस गणपती विसर्जन वेळी मणेरी कुबलवाडी वासियांना आले. त्या दोघांना तात्काळ येथील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालंय येथे उपचारासाठी दाखल केले.
त्यानंतर हा विषय ग्रामस्तानी दोडामार्ग पोलिसांना कळविला त्यानंतर पोलीस घटना स्थळी दाखल झाले. रेसिडेन्सी मालकाला गावातील ग्रामपंचायत सदस्य यांनी फोन लावला त्यावेळी त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याने उलट माझ्या इमारतकडील गेट जवळ तुम्ही कां गेलात असे उलटसुलट उद्धट प्रश्न केले. यावेळी सांतपलेल्या ग्रामस्तानी दोडामार्ग पोलीसात तक्रार दिली व त्या मणेरी रेसिडेन्सी च्या गोव्यातील मालकावर दोडामार्ग पोलिसांनी दखल पात्र गुन्हा दाखल केला असल्याचे सांगितले.