दोडामार्गात ठाकरे युवासेनेच्या नूतन पदाधिकाऱ्यांच्या जाहीर झाल्या निवडी

Edited by: संदीप देसाई
Published on: July 22, 2023 20:52 PM
views 231  views

दोडामार्ग : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने दोडामार्ग तालुका युवा सेना संघटना बांधणी जोमाने करण्यात येत असून शनिवारी दोडामार्ग तालुक्यात नव्या पदाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आल्या. यात युवा सेना मणेरी उपविभाग प्रमुख पदी प्रदीप सावंत, युवा सेना दोडामार्ग शहर समन्वयक पदी शाम खडपकर, युवा सेना कोनाळ उपविभाग संघटक प्रदीप गावडे, युवती सेना दोडामार्ग तालुका प्रमुख पदी गौरवी गणपत नाईक यांची निवड करण्यात आली आहे. 

युवासेना कार्यकारणी सदस्य सुप्रदाताई पाथरपेकर, युवासेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक अमि पेडणेकर, युवती सेना सिंधुदुर्ग जिल्हा विस्तारक रुचि राऊत,  युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवा सेना उपजिल्हाप्रमुख सागर नानोसकर, युवा सेना तालुकाप्रमुख मदन राणे यांच्या उपस्थितीत निवड जाहीर करण्यात आली.  यावेळी युवा सेना उपतालुकाप्रमुख संदेश गवस, सिद्धेश कासार, गोविंद राऊळ, माटणे युवासेना उपविभाग प्रमुख समीर मावसकर, कोनाळ युवासेना विभाग अल्विन लोबाे, युवा सेना हेवाळे शाखाप्रमुख रुपेश कदम, विजघर शाखाप्रमुख विजय कांबळे उपस्थित होते.