
सावंतवाडी : सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीच्या हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे 90 सभासद उपस्थित होते.
संस्थेच्या घटनेप्रमाणे उपस्थित सभासदांमधून सभेचे अध्यक्ष म्हणून शैलेश पै यांचे नाव एक मताने निवडण्यात आले. त्यामुळे शैलेश पै सभेचे अध्यक्ष पद स्वीकारले.नुकतीच सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून त्यामध्ये जे सभासद निवडून आले त्यांचे यावेळी अभिनंदन करण्यात आले. संस्थेच्या व शाळेच्या विकासात्मक दृष्टिकोनातून काही सूचना सभासदांकडून करण्यात आल्या तसेच संस्थेचे मावळते अध्यक्ष शैलेश पै यांचे तसेच त्यांच्या कार्यकारिणीने मागील पाच वर्षात समाधानकारक असे काम केल्याबद्दल सर्व सभासदांनी अभिनंदन केले.
पुढील पाच वर्षासाठी निवडून आलेल्या कार्यकारिणीत श्री.शैलेश पई, डॉ. प्रसाद नार्वेकर, श्री. मोहन वाडकर, श्री. मुकुंद वझे, श्री. रवींद्र स्वार, श्री. शंभा म्हापसेकर, श्री. गौरांग चिटणीस, श्रीमती. राजश्री टिपणीस, श्रीमती. नम्रता नेवगी. यांचा समावेश आहे. लवकरच नव्या कार्यकारिणी सदस्यांना पदभार दिले जाणार आहेत.