विदयार्थी कृती समिती अध्यक्षपदी हार्दिक कदम यांची निवड...!

Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 23, 2023 17:13 PM
views 146  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी व विद्यार्थ्यांमधील कला, क्रीडा, सांस्कृतिक गोष्टी व कौशल्य यांचा विकास करण्यासाठी व त्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य हक्क कृती समितीच्या अध्यक्षपदी सिंधुदुर्गनगरी येथील हार्दिक कदम यांची निवड झाली आहे त्यानंतर त्यांनी सिंधुदुर्गनगरी येथे बैठक घेऊन जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्याची नेमणूक केली असून जिल्ह्यातील विदयार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणार असे सागितले. 

विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक अध्यक्ष चेतन अरविंद पाटील व संस्थापक सचिव रामराजे तानाजीराव काळे हे आहेत. विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य ही विद्यार्थी संघटना अराजकीय विद्यार्थी संघटना आहे.या संघटनेची जिल्हा बैठक रविवारी सिंधुदुर्गनगरी- ओरोस शासकीय विश्रामगृह येथे विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्ह्याची जिल्हा व तालुका कार्यकारणीची प्रथम बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळेस विद्यार्थ्यांच्या हितासाठी कश्या प्रकारे काम करता येतील यावर चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर समिती मध्ये सामील झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळेस मातृत्व आधार फाउंडेशन या संस्थेचे संचालक हरिश्चंद्र (दादा) वेंगुर्लेकर यांनी मार्गदर्शन केले व वैचारिक चर्चा पार पडली. 

विद्यार्थी हक्क कृती समिती सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष पदी सानिका पाताडे यांची निवड करण्यात आली आहे, जिल्हा संपर्कप्रमुख पदी लंकेश जांभळे यांची निवड करण्यात आली आहे, जिल्हा प्रवक्ता व मालवण तालुका अध्यक्ष पदी दिक्षा लुद्बे यांची निवड करण्यात आली आहे, मालवण तालुका संपर्कप्रमुख पदी पूर्वा वेंगुर्लेकर यांची निवड करण्यात आली आहे, मालवण तालुका सहसंपर्कप्रमुख पदी गौरव कांदळगावकर यांची निवड करण्यात आली आहे, कुडाळ तालुका अध्यक्ष पदी सेजल जाधव यांची निवड करण्यात आली आहे, सावंतवाडी तालुका अध्यक्ष पदी सिद्धी लाड यांची निवड करण्यात आली आहे, सावंतवाडी तालुका कार्याध्यक्ष पदी दिया मालवणकर यांची निवड करण्यात आली आहे आणि वेंगुर्ला तालुका अध्यक्ष पदी जय मांजरेकर यांची निवड करण्यात आली. 

भविष्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये विविध तालुक्यातील शाळा व महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रम राबविले जाणार आहेत याची माहिती विद्यार्थी हक्क कृती समिती, महाराष्ट्र राज्य सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष हार्दिक सचिन कदम यांच्या वतीने देण्यात आली.