
सिंधुदुर्गनगरी : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 268-कणकवली, 269-कुडाळ, 270-सावंतवाडी या तीन विधानसभा मतदारसंघासाठी भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक म्हणून (General Observer) श्री. परवीन कुमार थिंद, भा.प्र.से. (मोबाईल - 9359614815 कार्यालय दूरध्वनी क्र.02362-223325 ई-मेल आयडी - gen.observer.sindhu2024@gmail.com) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्री.थिंद हे सर्वसामान्य नागरिक, राजकीय पक्ष अथवा त्यांचे प्रतिनिधी, निवडणूक लढवणारे उमेदवार अथवा त्यांचे प्रतिनिधी यांना भेटण्यासाठी कार्यालयीन दिवशी दुपारी 2.00 ते 3.00 या वेळेत निवडणूक निर्णय अधिकारी, 269 - कुडाळ विधानसभा मतदारसंघ यांचे कार्यालय, उपविभागीय कार्यालय, कुडाळ, ता.कुडाळ, जि.सिंधुदुर्ग येथे उपलब्ध असणार आहेत. तसेच त्यांचे वास्तव्य एम.आय.डी.सी. विश्रामगृह, कुडाळ, जि.सिंधुदुर्ग येथे असणार आहे.