कणकवलीतून वृद्धा बेपत्ता

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: August 07, 2025 19:07 PM
views 532  views

कणकवली : मूळ कसवण व सध्या कणकवली - बाजारपेठ येथे भाड्याने राहत असलेल्या सुनंदा श्यामसुंदर कसवणकर (७५) या  राहत्या घरातून बेपत्ता झाल्या आहेत. ही घटना बुधवार, ६ ऑगस्टला सकाळी ६ वा. सुमारास उघडकीस आली. याबाबतची खबर सुनंदा यांचे शेजारी सुंदर सुरेश महाजन (४२, रा. कणकवली - बाजारपेठ) यांनी कणकवली पोलिसांत दिली आहे.

खबरीनुसार सुनंदा या कणकवली बाजारपेठेतील नगरपंचायतीनजीकच्या एका चाळीमध्ये भाड्याने राहतात. सुनंदा मंगळवारी सायंकाळी ७.३० वा .सुमारास सुंदर यांच्या घरी टीव्ही बघायला गेल्या होत्या. दरम्यान बुधवारी सकाळी ६ वा. सुमारास सुंदर यांना सुनंदा यांच्या घराचा दरवाजा बंद दिसला याबाबत त्यांनी सुनंदा यांच्या मुलाशी संपर्क साधला. मात्र आपली आई आपल्याकडे आली नसल्याचे मुलाने सांगितले. त्यानंतर सुंदर यांनी आजूबाजूला शोधही घेतला. मात्र सुनंदा कुठेच आढळून आल्या नाहीत, असे खबरीत म्हटले आहे.

सुनंदा यांनी सफेद रंगाची व त्यावर गुलाबी फुले असलेली साडी नेसली आहे. त्यांचा वर्ण सावळा तर हातात मोरपीसी बांगड्या आहेत. अशा वर्णनाची वृद्धा आढळल्यास संपर्क साधावा, असे आवाहन कणकवली पोलिसांनी केले आहे.