
वैभववाडी : सोनाळी वाणीवाडी येथील पांडुरग भिकाजी गोसावी (वय-७०) या वृध्दाने राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेवुन आत्महत्या केली. हा प्रकार आज (ता.७) एक वाजण्याच्या सुमारास झाला. पत्नीच्या मृत्यूच्या नैराश्यातून त्यांनी हा प्रकार केला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.
सोनाळी वाणीवाडी येथील श्री.गोसावी हे आपली मुलगी, जावई आणि नातवासह राहत होते. त्यांच्या पत्नीचे चार महिन्यापुर्वीच निधन झाले होते. पत्नीच्या निधनाचा त्यांना मोठा धक्का बसला होता. तिथंपासुन ते निराश होते. दरम्यान आज दुपारी घरात कुणीही नसल्याचे पाहुन त्यांनी पत्नीच्या साडीच्या सहाय्याने लोखंडी बाराला गळफास घेवुन आत्महत्या केली. दुपारनतंर घरात आलेल्या मुलीने घरात येताच त्यांना श्री.गोसावी साडीला लटकलेल्या स्थितीत दिसुन आल्यानंतर ती कोलमडुन केली. तिच्या रडण्याच्या आवाजाने आजुबाजुला असलेले शेजारी तेथे आले. त्यानंतर ही माहीती पोलीस पाटीलांनी पोलीसांनी दिली. पोलीसांनी घटनास्थळी जावुन पंचनामा केला. त्यानंतर अत्यंसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्यात मुलगी, जावई आणि नातु असा परिवार आहे.