एकनाथ शिंदेंना द्यायला किती कमी पडले ? : रूपेश राऊळ

.... म्हणून शिक्षण खात दिलं !
Edited by: विनायक गांवस
Published on: February 08, 2024 09:54 AM
views 193  views

सावंतवाडी : निवडूनकीत हतबल असणारे केसरकर कोट्यवधी रूपये देऊ कसे शकतात ? जर त्यांनी कमिटमेंट पाळली नाही म्हणून मंत्रीपद नाकारलं असेल तर एकनाथ शिंदेना किती दिलेत ते सांगावं. त्यांना द्यायला किती कमी पडले ? ज्यामुळे तुम्हाला शिक्षण खात मिळालं. ते देखील दीपक केसरकर यांनी जाहीर कारवा अस आव्हान तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी दिल.

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी आमच्या पक्षप्रमुखांवर व पक्षावर खोटे आरोप केले आहेत. त्यांनी हे लक्षात ठेवावे शिवसेना बाळासाहेब ठाकरेंमुळे कोकणात वाढली. आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या सभा यशस्वी झाल्यानं केसरकर बिथरले आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला लोक जमत नाहीत त्यामुळे ते घाबरले आहेत. म्हणून, आजवर सभा घेऊ शकले नाहीत.

एवढंच काय तर महासंस्कृती महोत्सवाला सुद्धा त्यांना लोक जमवता आली नाही. आपल अपयश झाकण्यासाठी ते आरोप करत आहे. एवढेच स्वाभिमानी होते तर तेव्हाच पक्षातून का नाही बाहेर पडले? असा सवाल उबाठा शिवसेनेचे तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी केला.