जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी राजन तेलींसह आठ जणांची होणार चौकशी

Edited by: स्वप्नील वरवडेकर
Published on: September 30, 2025 21:23 PM
views 1033  views

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूकप्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांवर जिल्हा बँकेने केलेल्या तक्रारीची मुंबई येथील सीबीआय लाचलुचपत प्रतिबंधक शाखेचे पोलिस अधीक्षक यांनी दखल घेऊन  पुढील कार्यवाहीसाठी दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक विभागाकडे (BS&F) पाठविली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या‌ फसवणुकीची  तक्रार जिल्हा बॅंकेचे व्यवस्थापक विश्वनाथ दोरलेकर यांनी केली होती. कर्जाच्या रक्कमांचा वापर चुकीच्या पद्धतीने करण्यात आला आहे. हे व्यवहार तेली यांच्यासह आठ जणांनी २०२१ ते २०२२ या कालावधीत केलेले आहेत, असे तक्रारीत म्हटले होते. याप्रकरणी तेली यांच्यासह आठ जणांच्या बॅंक व्यवहाराची  चौकशी करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक, केंद्रीय अन्वेषण विभाग, लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, मुंबई यांनी दिले आहेत.

आठ जणांमध्ये राजन तेली यांच्यासह प्रथमेश राजन तेली, सर्वेश राजन तेली, प्रदीप मनोहर केरकर, शैलजा एम. सिंगबाळ, सीमा महेश सबनीस, रुजिता राजन तेली, सुनील कृष्णा निरवडेकर‌ यांचा समावेश आहे.