आधुनिक उद्योग कोकणात आणण्यासाठी प्रयत्न : नारायण राणे

रोजगाराचा प्रश्न मिटेल ; तळकोकण आत्मनिर्भर बनेल : नारायण राणे
Edited by:
Published on: June 06, 2023 15:52 PM
views 121  views

सावंतवाडी : शहरातील कोट्यवधीच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महाराष्ट्रतील निसर्गरम्य कोकणाचा सर्वांगीण विकास होऊन सिंधुदुर्ग प्रमुख पर्यटन स्थळ व्हाव यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोडामार्ग एमआयडीसीत लवकरच कारखानदारी येईल व रोजगार निर्मिती होऊन रोजगार मिळणार आहे. तळकोकणात गतिमान विकास होईल, दरडोई उत्पन्न वाढवले जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५३ योजना राबवून सिंधुदुर्ग जिल्हा आत्मनिर्भर बनवला जाईल अस मत नारायण राणे यांनी व्यक्त केले. ‌

केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले, शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केलेल्या प्रास्ताविकात सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आवश्यक योजना व त्यासाठी लागणारा निधीची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मुख्यमंत्री त्या योजनांना निधी उपलब्ध करून देतील हा मला विश्वास आहे. या जिल्ह्यात उद्योग यावेत, तरूणांना रोजगार मिळाला अशी मागणी केसरकर यांनी केली. सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री म्हणून कालच मुख्यमंत्री यांच्यासोबत सह्याद्रीवर बैठक झाली. त्यात नवनवीन उद्योग, आधुनिक उद्योग महाराष्ट्रात यावे कोकणात यावे यासाठी आमचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुर्ण पाठिंबा आम्हाला आहे. आतापर्यंत जो विकास कोकणाचा व्हायला हवा होता त्यात विमानतळ, चौपदरी महामार्ग, रेल्वेगाड्या व पायाभूत सुविधा, पर्यटनाच्या आवश्यक गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. भविष्यातही महाराष्ट्रतील निसर्ग रम्य कोकणभागाचा सर्वांगीण विकास व्हावा व सिंधुदुर्ग प्रमुख पर्यटन स्थळ व्हाव अशी माझी इच्छा आहे. दोडामार्ग एमआयडीसीत लवकरच कारखानदारी येईल व रोजगार निर्मिती होईल. तळकोकणात गतिमान विकास होईल, दरडोई उत्पन्न वाढवले जाईल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ५३ योजना राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यांना आत्मनिर्भर बनवू. भारत महासत्ता बनविण्यासाठी पंतप्रधानांना सर्व मिळून योगदान देऊ अस मत व्यक्त केले. ‌


याप्रसंगी व्यासपीठावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, उद्योगमंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, आमदार भरत गोगावले, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, आमदार रवींद्र फाटक, युवराज लखमराजे सावंत-भोंसले आदी उपस्थित होते.