एज्यूस्मार्ट ॲक्टिविटी सेंटरच्या विद्यार्थ्यांचं घवघवीत यश !

Edited by: उमेश बुचडे
Published on: January 25, 2024 11:02 AM
views 144  views

कणकवली : एज्यूस्मार्ट ॲक्टिविटी सेंटर अबॅकस स्पर्धा परीक्षेचा 16वा राष्ट्रीय पुरस्कार सोहळा नुकताच डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे पार पडला. या परीक्षेत एज्यूस्मार्ट, कणकवली सेंटरच्या विद्यार्थ्यांनी कौतुकास्पद कामगिरी केली. 16 वी राज्यस्तरीय अबॅकस परीक्षा ठाणे येथे पार पडली. त्यात भारत भरातून 2000 हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात कणकवली येथील स्पृहा विजय राणे, ओंकार मिलिंद पाटील,दुर्वांक स्वप्निल नाईक, साशा अमोल तळेकर यांनी अंतिम फेरीत यश मिळवले. 

  तर कु.रुद्र सिद्धेश गोसावी, समृद्धी सागर पवार, आरोही वैभव ठाकूर,अर्णव संतोष पाटील,केदार निखिल टोणेमारे,हर्षिता निकेतन राणे हे रिजनल अचिवर पुरस्काराचे मानकरी ठरले. आरोही वैभव ठाकूर व निधी साळगावकर यांनी हस्ताक्षर परीक्षेतही यश संपादन केले.या सर्वांना एज्यूस्मार्ट ॲक्टिविटी सेंटर, कणकवलीच्या सौ.सोनाली पारकर यांचे मार्गदर्शन लाभले.