गणेश भक्त मुक्त चॅरिटेबलच्यावतीने शैक्षणिक साहित्य

Edited by: श्रीधर साळुंखे
Published on: June 22, 2024 14:58 PM
views 194  views

वैभववाडी : मुंबई येथील गणेश भक्त मुक्त चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने गांगेश्वर विद्यामंदिर भुईबावडा मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ट्रस्टच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

   ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन मुंबईतील ट्रस्टने भुईबावडा येथील विद्यालयात विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले. यावेळी माजी उपसभापती भालचंद्र साठे, भुईबावडा गावचे  सरपंच बाजीराव मोरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कुणाल मोरे, गणेश भक्त मुक्त चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त रविंद्र पांचाळ व सर्व सदस्य, व्यवस्थापन समितीचे सर्व पदाधिकारी, गावचे प्रतिष्ठित व्यक्ती श्रीधर मोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका कुंभार, उपशिक्षिका शिंदे तसेच विद्यार्थी ग्रामस्थ आणि पालक वर्ग आदी उपस्थित होते.