
सावंतवाडी : पुणे येथील सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने चराठे पीएमश्री शाळा नं.१ च्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. या शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना तसेच अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्यावतीने शैक्षणिक साहित्य मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
यावेळी सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडचे एरिया सेल्स मॅनेजर ओंकार पडते, कोलगावच्या रामेश्वर ट्रेडर्सचे मालक सुरेश सुंदेशा, रुपेश परब, पत्रकार दीपक गावकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमेश परब, माजी अध्यक्ष समीर नाईक, सदस्य नारायण मेस्त्री, सुयश्री वेजरे, नागेश बांदेकर, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर, शिक्षिका आदिती चव्हाण, अमिषा कुंभार, धनदा शिंदे, अंगणवाडी सेविका निखिता राणे, श्रीम. मेस्त्री, मदतनीस श्रीम. गोसावी, श्रीम. परब आदी उपस्थित होते.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री पेडणेकर यांनी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वितरण केल्याबद्दल सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडचे एरिया सेल्स मॅनेजर ओंकार पडते यांचे आभार मानले. तसेच व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांनीही सह्याद्री इंडस्ट्रीज लिमिटेडच्या या शैक्षणिक उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जयश्री पेडणेकर यांनी तर आभार धनदा शिंदे यांनी मानले.