आमदार ज्ञानेश्वर म्हात्रेंच्या निधीतून शाळांना शैक्षणिक साहित्य

Edited by:
Published on: January 24, 2025 11:57 AM
views 243  views

सावंतवाडी : कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024-25 अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या ४ तालुक्यातील शाळांचे शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम संपन्न झाला.

कोकण विभाग शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या आमदार स्थानिक विकास कार्यक्रम सन 2024-25 अंतर्गत कुडाळ, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि सावंतवाडी या चार तालुक्यातील 35 शाळांना डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंट वाटप कुडाळ हायस्कूल कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास भाजपा उपाध्यक्ष प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद करलकर, यशवर्धन राणे, सर्वेश पावस्कर (राष्ट्रवादी अ. प.) स्वरूप वाळके, रविराज नार्वेकर जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी अनिल मोहरे सर,  सिंधुदुर्ग जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष वामन तर्फे सर,  लतेश मामा नांदगावकर, खरात सर, ठाकरे सर, साळवी सर, आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते.दोन वर्षाच्या कालावधीमध्ये  त्यांच्या आमदार फंडातून 1  कोटी 25 लाखाचे साहित्य ई लर्निंग चे सर्व शाळांना दिले. तसंच जिल्हा नियोजन फंडातून माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडून 2 कोटीचे सोलर  पॅनल व 2 कोटीचे संगणक  मंजूर करून घेतले, लवकरच संगणक चे सुद्धा वाटप होणार असून दोन वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाळांसाठी  5 कोटी 25 लाखाचे शैक्षणिक साहित्य  आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या  प्रयत्न आणि सर्व शाळांना मिळाले, त्यामुळे सर्व शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांनी आनंद व्यक्त केला आहे. खऱ्या अर्थाने आता आनंददाई शिक्षण देण्याचे काम  आमदार म्हात्रे यांच्या प्रयत्नाने होत आहे असे उद्गार काढले जातायत.