
सावंतवाडी : समाज मंदिर येथील दिव्यांग विकास केंद्र येथे 65 दिव्यांग विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. त्यातील 25 विद्यार्थी नियमित उपस्थित असतात. तेथील शिक्षक यांच्या मागणीनुसार सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून दिव्यांग मुलांसाठी शैक्षणिक साहित्य व भेटवस्तू दिल्या जातात.
जागतिक दिव्यांग दिन आहे. या दिनाचे औचित्य साधून हा जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानच्या माध्यमातून मुलांना भेटवस्तू व खाऊ देण्यात आले. याप्रसंगी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.सतीश बागवे शरदीनी बागवे, रूपा मुद्राळे, लक्ष्मण कदम, हेलन निबरे,रवी जाधव तसेच तसेच प्रशिक्षण केंद्राच्या अध्यक्षा रूपाली पाटील, शिक्षिका विदिशा सावंत, मदतनीस द्रोपती राऊळ, पालक तनया भोगण, शालिनी राणे, रूपावली देसाई उपस्थित होते सामाजिक बांधिलकीच्या या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.










