'माझा सिंधुदुर्ग'चा शैक्षणिक साहित्य वितरण 7 जूनला

Edited by: नागेश दुखंडे
Published on: June 05, 2025 15:03 PM
views 535  views

कुडाळ : माझा सिंधुदुर्ग विकास संस्था (रजि.) व सलग्न माझा सिंधुदुर्ग ग्रुप यांचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आईवडिलांचे छत्र हरपलेल्या गरजू, होतकरू शालेय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आधार देण्याच्या उद्देशाने " शालेय शिष्यवृत्ती" उपक्रम राबवला जातो.

यावर्षी या उपक्रमाचे हे पाचवे वर्ष आहे. आत्तापर्यंत उपक्रमाच्या माध्यमातून  सिंधुदुर्ग जिल्हयातील सर्व तालुक्यातून ३०० पेक्षा अधिक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पोहोचवली आहे. शैक्षणिक साहित्य वितरण कार्यक्रम शनिवार दिनांक ७ जून २०२५ रोजी सकाळी १०:०० ते १:०० या वेळात मराठा समाज हॉल, कुडाळ या ठिकाणी संपन्न होत आहे.  

आई वडिलांचे छत्र हरपल्या व वडील अपंग, दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या गरीब परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या १३४ निवडक विद्यार्थ्यांना यावेळी संपूर्ण वर्षासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य ( दप्तर, वह्या, कंपास पेटी, पेन पेन्सिल सेट, रंगपेटी, परीक्षा पॅड, पाणी बॉटल, गिओमेट्री सेट इत्या. ) मोफत बहाल केले जाणार आहे.

तरी या महत्वाकांक्षी शैक्षणिक उपक्रमात सर्वांनी सहभागी होऊन जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना मदत पोहोचवण्यास सहकार्य करावे असे आवाहन माझा सिंधुदुर्गचे संस्थापक अध्यक्ष विकास सं. पालव यांनी केले आहे.