असलदे सोसायटी मार्फत पाहिले शैक्षणिक कर्ज वाटप...!

Edited by: उमेश बुचडे
Published on: July 21, 2023 12:38 PM
views 214  views

कणकवली : श्री. रामेश्वर विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. असलदेच्या चेअरमन पदाचा पदभार स्वीकारला तेव्हा काही महत्वपूर्ण संकल्प केले आहेत, त्यामध्ये गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण घेताना आर्थिक अडचण असेल तर आपल्या संस्थेच्या वतीने कर्ज पुरवठा करायचा हा निर्णय धाडसी असला तरी शैक्षणिक दृष्ट्या मुलांना भवितव्यासाठी आणि दिशा देण्याच्या दृष्टीने महत्वाचा होता.आमच्या संचालक मंडळाने या निर्णयाला पाठिंबा दर्शवला.कारण,गावातील मुलांचे आर्थिक अडचणीमुळे शिक्षण अपूर्ण राहू नये,ही प्रामाणिक भावना आहे. संस्थेमार्फत पाहिले शैक्षणिक कर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती सोसायटी चेअरमन भगवान लोके यांनी दिली.

सोसायटी सभासद पंकज गणपत आचरेकर यांची मुलगी गौरी आचरेकर हिला शैक्षणिक कर्ज दीर्घ मुदत *बी. इ. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन्स इंजिनीअरिंग* हे उच्च शिक्षण घेण्यासाठी  २ लाख मंजूर करणेत आले आहे.या कर्जाची परतफेड ५ वर्षे फक्त व्याज भरायचे,शिक्षण पूर्ण झाल्यावर हप्ते सुरु होणार आहेत.त्या कर्जापैकी पहिल्या वर्षाची कॉलेज फी हप्ता धनादेश वाटप करण्यात आला. आपली सोसायटी भविष्यात उच्च शिक्षण घेण्यासाठी सर्व सामान्य गावातील शेतकऱ्यांच्या मुलांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर कर्ज पुरवठा करणार आहे,त्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज प्रस्ताव असल्यास सादर करावेत,असे आवाहन भगवान लोके यांनी केले आहेत.

कर्जदार पंकज आचरेकर यांना धनादेश सुपूर्द करण्यात आला.यावेळी व्हा.चेअरमन दयानंद हडकर,तंटामुक्त समितीचे अध्यक्ष बाबाजी शिंदे व विजय आचरेकर,श्री.खरात,सचिव अजय गोसावी उपस्थित होते.