मांगेली शाळेत शिक्षण सप्ताह !

Edited by: लवू परब
Published on: July 23, 2024 06:05 AM
views 178  views

दोडामार्ग : राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त शालेय शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत आयोजित शिक्षण साप्ताहाचा सोमवारी पहिला दिवस तालुक्यातील मांगेली प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला.

यास पार्श्वभूमीवर दोडामार्ग शिक्षण विभागाने सोमवार 22 जुलै पासून ते 28 जुलै पर्यंत सप्ताह राबविणे असल्याचे शिक्षण अधिकारी रूपाली तेलतुंबडे यांनी सांगितले आहे. सप्ताह प्रत्येक दिवशी नेमके कुठले उपक्रम घ्यावे याबाबतही योग्यरित्या मार्गदर्शन पर सूचना आणि काय करावे याचे वेळापत्रक दिले आहे.  22 जुलै रोजी अध्ययन अध्यापन साहित्य दिवस, 23 जुलै रोजी मूलभूत संख्याज्ञान व साक्षरता दिवस, 20 रोजी क्रीडा दिवस या विद्यार्थ्यांसाठी शारीरिक मानसिक सामाजिक नावाने दृष्ट योग्य होण्यासाठी प्रयत्न करायचे आहेत, 26 जुलै रोजी कौशल्य डिजिटल उपक्रम दिवस साजरा करताना विद्यार्थी पालकांमध्ये समन्वय साधायचा आहे. 27 जुलै रोजी मिशन लाईफच्या दृष्टीक्षेपात इको क्लब उपक्रम शालेय पोषण दिवस आणि  28 जुलै रोजी समुदाय न चुकता घेऊन माहिती शिक्षण परिषदेने विकसित केलेल्या प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी ही सांगण्यात आले आहे.