केंद्रशाळा कुणकेश्वरमध्ये शिक्षण सप्ताह उत्साहात

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 26, 2024 11:29 AM
views 98  views

देवगड : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद,पुणे यांच्या वतीने शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि.२५ जुलै रोजी शिक्षण सप्ताहाचा चौथा दिवस सांस्कृतिक दिवस साजरा करण्यात आली. या वेळी प्रमुख उपस्थिती नारायण चव्हाण ( विषय तज्ज्ञ गटसाधन केंद्र, देवगड ) व  केंद्रप्रमुख भाग्यश्री जोईल यांनी भेट देत शुभेच्छा देत मार्गदर्शन केले.

यावेळी सांस्कृतिक दिवसा निमित्त विविध भारतीय वेशभूषा विद्यार्थी करून आले होते.त्यांचे फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेण्यात आल्या . त्यानंतर विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृती जागृत करणारी विविध नृत्य सादर करून सांस्कृतिक कार्यक्रम साजरा केला .या कार्यक्रमात विषय तज्ञ श्री नारायण चव्हाण सर यांनी अप्रतिम असे गीत गायन केले . त्याच बरोबर केंद्रप्रमुख सौ भाग्यश्री जोईल यांनीहीं सुदर गीत गायन केले .त्यानंतर भारतीय संस्कृती जपणारे विविध भारतीय तृणधण्याच्या खादय पदार्थाचे  प्रदर्शन शाळेत भरवण्यात आले . त्यांतून उत्तम व पौष्टिक अशा पदार्थांच्या रेसिपीजचे स्पर्धा घेऊन नंबर काढण्यात आले . सर्व स्पर्धाचे परीक्षण नारायण चव्हाण सर ,भाग्यश्री जोईल मॅडम आणि अमृता पाटील मॅडम यांनी केले .        

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक तात्या लवटे ,पदवीधर शिक्षिका अमृता पाटील मॅडम ,पदवीधर शिक्षक  विठ्ठल थिकोळे सर  आणि उपशिक्षिका पल्लवी ढेरे मॅडम  यांनी विशेष प्रयत्न केले. या कार्यक्रमाला  सर्व शिक्षक ,सर्व विदयार्थी ,व पालक उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मुख्याध्यापक तात्या लवटे तर आभार  विठ्ठल थिकोळे यांनी मानले .