जामसंडेतील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत शिक्षण सप्ताह

Edited by: नागेश दुखंडे
Published on: July 25, 2024 12:03 PM
views 132  views

देवगड : महाराष्ट्रातील प्रत्येक बालकास आरोग्यदायी आणि आनंददायी शिक्षण देऊन “ निपुण बालक “ घडविण्यासाठी महाराष्ट्र शासनाने दि.२२ जुलै ते २८ जुलै या कालखंडात ‘ शिक्षण सप्ताह ‘ प्रत्येक शाळा – शाळांमध्ये आयोजित केला असून त्याचाच एक भाग म्हणून जामसंडे येथील श्रीराम मोरेश्वर गोगटे प्रशालेत विद्यार्थी व शिक्षकांना ‘ निपुण प्रतिज्ञा देण्यात आली .

आपण सारे मिळून आपल्या मुलांसाठी निखळ आनंददायी समृद्ध अनुभवाच्या संधी देणारी , अभिव्यक्तीचे आकाश खुलं करणारी, मुक्त छंद जोपासणारी , नेतृत्वाच्या संधी देणारी आणि आत्मसन्मानाने जपणारी शाळा निर्माण करूया अशी ‘निपुण प्रतिज्ञा’ विद्यार्थी व शिक्षकांनी आज घेतली .

प्रतिज्ञा वाचन जेष्ठ शिक्षक . विनायक ठाकूर यांनी केले . प्रशालेच्या शेकडो विद्यार्थ्यांसह मुख्याध्यापक . संजय गोगटे , जेष्ठ शिक्षक . सुनील जाधव , सौ.मानसी मुणगेकर , . मोहन सनगाळे , . सुनील भाकरे या शिक्षकांनी “ निपुण प्रतिज्ञा “ गृहण केली.