
दोडामार्ग : मणेरी येथील विश्राम कुबल आणि कुटुंबीय यांच्या 'कुबलांचा राजा' चे राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी बुधवारी दर्शन घेतलं. मणेरी गावात गेली कित्येक वर्षे सर्व कुबल कुटुंबीय एकत्रीत पणे अकरा दिवसांचे गणेश पूजन करतात. अबाल वृद्धांसाठी दरवर्षी गणेश उत्सव सण जिव्हाळ्याच्या असतो. यावर्षी गणेशोत्सवास शिक्षण मंत्री केसरकर यांनी भेट दिल्याने तेथील नागरिक व गणेश भक्तांचा आनंद द्विगुणित झाला आहे. या भेटीवेळी विश्राम कुबल यांसह शिवसेनेचे तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस, पदाधिकारी सूर्यकांत गवस, विठोबा पालयेकर, भगवान गवस, रामदास मेस्त्री, ग्रामपंचायत सदस्य विशाल परब व कुबल कुटुंबीय उपस्थित होते.