शिक्षणमंत्री केसरकरांकडून गौरव गुणवंतांचा !

Edited by: विनायक गावस
Published on: August 09, 2023 16:33 PM
views 197  views

सावंतवाडी : मंत्री दीपक भाई केसरकर मित्रमंडळ सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी फेब्रुवारी, मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १० वी व १२ वी परीक्षेत उज्ज्वल यश प्राप्त केलेल्या प्रत्येक शाळेतील तीन विद्यार्थ्यांचा व शिष्यवृत्तीप्राप्त विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. 


त्याचप्रमाणे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात ९८ व ९९ गुण प्राप्त झालेत त्याही विद्यार्थ्यांचा गौरव क्रांतीदिनाचे औचित्य साधून करण्यात आला. हा कार्यक्रम सावंतवाडी येथे काझी शहाबुद्दीन हॉलमध्ये आयोजित करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या शाळांचे निकाल २०२३ मध्ये १००% लागले आहेत त्या मुख्याध्यापकांचा सन्मानपत्र व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. तसेच सामाजिक, शैक्षणिक, कृषी या क्षेत्रातील उल्लेखनीय काम केलेल्या व्यक्तींचा सन्मान शाल, श्रीफळ देऊन केला गेला. यावेळी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, प्रेमानंद देसाई, अँड. निता कविटकर, भारती मोरे, गटशिक्षणाधिकारी कल्पना बोडके, नगरसेविका शुभांगी सुकी, दादा मडकईकर, नंदू शिरोडकर, भरत गावडे नामदार दीपकभाई केसरकर मित्रमंडळ  सावंतवाडी व सिंधुदुर्ग जिल्हा मराठी अध्यापक संघाचे सदस्य उपस्थित होते.