संविताश्रम, आनंदाश्रयमध्ये शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस साजरा...!

Edited by: विनायक गावस
Published on: July 19, 2023 12:13 PM
views 178  views

सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री तथा कोल्हापुर जिल्हा व मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर साहेब यांचा ६८ वा वाढदिवस आज मोठ्या उत्साहाने साजरा झाला. या वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने विविध सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने दीपकभाई मित्रमंडळाच्यावतीने जीवन आनंद संस्था संचालित संविताश्रम पणदूर येथे भेट देऊन २ हॉस्पिटल बेड, २ सलाईन स्टॅण्ड, १ फोल्डींग स्ट्रेचर, १ वॉटर क्युरीफायर भेट देण्यात आली. 

तर जीवन संजीवन सेवा ट्रस्टच्या आनंदाश्रय अणाव येथे भेट देऊन २ वॉकर, व २ व्हीलचेअर भेट देण्यात आली. येथील ज्येष्ठ नागरिकांसोबत शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते दीपक केसरकर मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते.