राज्यातील सुशिक्षित बेरोजगार सेवा सोसायट्यांना सक्षम करणार : शेखर निकम

Edited by:
Published on: January 31, 2025 12:02 PM
views 297  views

सावर्डे : संपूर्ण राज्यातील सुशिक्षित बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांचे गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न लवकरच मार्गी लाऊन त्याना अधिक सक्षम करून त्यांचे माध्यमातून राज्यातील बेरोजगारीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे प्रतिपादन चिपळूण संगमेश्वर चे लोकप्रिय आमदार श्री शेखरजी निकम यांनी केले आहे.राज्य बेरोजगार व स्वयंरोजगार फेडरेशन तसेच ब्रहणमुंबई व मुंबई फेडरेशन यांचे वतीने नुकताच त्यांचा साखर भवन येथे मुंबई जिल्हा बँकेचे ज्येष्ठ संचालक नंदकुमार काटकर साहेब यांचे हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.

आज सातत्याने सरकार दरबारी या बेरोजगार संस्थांचे प्रश्न ते मांडत आहेत. नुकतेच त्यांनी राज्यातील या सेवा सोसायट्याना विना निविदा १० लाख रुपयांची कामे सरकार कडून देण्याचे आदेश ही मंजूर करून घेतले असून येणाऱ्या अधिवेशनात ही उर्वरित प्रश्नांबाबत आवाज उठविणार असल्याचे आश्वासन दिले आहे. सातत्याने सर्व खात्याच्या मंत्र्यांकडेही सदरच्या सेवा संस्थाना कामे उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करत असल्याने राज्यातील सर्व फेडरेशन च्या वतीने त्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यांच्याच विनंतीनुसार आज मा. ना. श्री बाबासाहेब पाटीलसाहेब सहकार मंत्री महाराष्ट्र राज्य, मंत्रालय मुंबई यांच्या अध्यक्षतेखाली साखर भवन नरिमन पॉइंट मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.राज्यातील पंजीकृत स्वयंरोजगार बेरोजगार सेवा सहकारी संस्थांच्या प्रलंबित मागण्यांबाबत या बैठकीत चर्चा होऊन सेवा संस्थांचे प्रश्न तातडीने मार्गी लावण्याबाबत मंत्री महोदयानी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.

सदर बैठकीस आमदार शेखरजी निकम साहेब,आमदार प्रसादजी लाडसाहेब, सचिव कौशल्य विकास व उद्योजकता विभाग, सहकार आयुक्त, उपसचिव सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदकुमार काटकर मुंबई, सिकंदर पटेल लातूर, शरद देवरे नाशिक, जनार्दन चांदणे पालघर,सचिन कोल्हापुरे रत्नागिरी, समीर रजपूत औरंगाबाद, जयंत शिरीषकर, स्वप्निल फाटक, श्रीनिवास देवरूखकर,विजय केदारे, कांबळे, सावर्डेकर, स्मिता मॅडम मुंबई गोरखनाथ सूर्यवंशी सांगली ,ससाणे पुणे तसेच राज्यांतील जिल्हा फेडरेशनचे अध्यक्ष व संचालक यावेळी बहुसंखेने उपस्थित होते.