
देवगड : ई - पीक पाहणी नोंदणीस 30 नोव्हेंबर पर्यंत मुदत वाढ मिळाली आहे. पीक पहाणी नोंदणी करण्यासाठी तहसिलदार पवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे.
राज्यात उद्भ्वलेल्या पुरसदृश परिस्थिती, अवकाळी पाऊस, दबार पेरणी आदी कारणास्थव मोठया प्रमाणावर पीक पहाणी नोंदी करण्यात आलेल्या नव्हत्या. पीक पहाणी नोंदणी अभावी राज्यातील कोणताही शेतकरी नैसर्गिक आपत्ती , पीक विमा, पीक कर्जापासून वंचित राहू नये म्हणून जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांचे आदेशन्वये 30 नोव्हेंबर २०२५अखेर पर्यंत पीक पहाणी नोंदणीस मुदत वाढ देण्यात आलेली आहे. तरी देवगड तालुक्यातील शेतक-यांनी पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधन्याचे आवाहन तहसिलदार रमेश पवार यांनी केले आहे.










