
दोडामार्ग : शासनाच्या विविध योजना गावपातळीवर प्रत्यक्षात राबवताना सरपंच यांचेवर मोठी जबाबदारी असते. आपले कुटुंब सांभाळून गावाचा विकास करताना महिला सरपंच यांना तर तारेवरची कसरत करावी लागते. तरी मोठ्या हिम्मतीने गाव विकासाचे स्वप्न घेऊन उतरलेल्या झरे-२ सरपंच श्रुती विठ्ठल देसाई यांनी माझी वसुंधरा 2.5 अंतर्गत आपल्या झरे-२ गावात कोणाचीही मदत न घेता ग्रामपंचायत मधील निधी खर्च न करता स्व निधी मधून घरपट्टी माफी बरोबरच पर्यावरण पूरक गणपती मूर्तींचे पूजन व मूर्तीची सजावट व स्वच्छ सुंदर घर या स्पर्धा घेण्याचे ठरवले आहे.
या स्पर्धेत झरे-२ गावातील सर्व स्पर्धकांनी भाग घेण्यासाठी आपली नावे ग्रामपंचायत अधिकारी झरे-२ यांच्याकडे देण्यात यावीत असे आवाहन त्यांनी आपल्या गावातील स्पर्धकांना केले आहे. दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक येणाऱ्या स्पर्धकाला सरपंच श्रुती विठ्ठल देसाई यांचे कडून रोख स्वरूपात बक्षीस रक्कम देऊन गौरवण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.