न्हावेली मर्यादित इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा

Edited by: विनायक गांवस
Published on: September 05, 2024 12:17 PM
views 49  views

सावंतवाडी : न्हावेली युवा उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या संकल्पनेतून न्हावेली गाव मर्यादित गणेश चतुर्थी निमित्त इकोफ्रेंडली गणेश सजावट स्पर्धा व महिलांसाठी फुगडी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा विनाशुल्क असेल अशी माहिती देण्यात आली आहे.

स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक अक्षय पार्सेकर पुरस्कृत ११११ रूपये आणि सहभाग प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक युवा सामाजिक कार्यकर्ते रुपेश नाईक पुरस्कृत 777 रूपये व सहभाग प्रमाणपत्र, तृतीय पारितोषिक उदय परब पुरस्कृत 555 रूपये व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धेत गणेश मूर्ती मातीची असणे बंधनकारक असेल. माटवीच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य तसेच हलता किंवा स्थिर देखावा पर्यावरण पूरक असावा, सजावटीसाठी थर्माकोलचा वापर केल्यास अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशाची अंतिम तारीख 13 सप्टेंबर रोजी रात्री 10 वाजेपर्यंत आहे. आपल्या गणेश सजावटीचा फोटो, नाव, वाडी अशी माहिती समीर पार्सेकर, ओम पार्सेकर, रुपेश नाईक यांच्याकडे द्यावी असे आवाहन उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी केले आहे. 

 तसेच महिलांसाठी फुगडी स्पर्धाही आयोजित करण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक 777 रूपये व द्वितीय पारितोषिक 555 रूपये ठेवण्यात आले आहे. मंडळानी ग्रुपचा फुगडी व्हिडिओ पाठवावा असे आवाहन उपसरपंच अक्षय पार्सेकर यांनी केले आहे.