
सावंतवाडी : माडखोल - सावंतवाडी रोडवरील कारीवडे चर्च जवळ वळणाचा अंदाज न आल्याने इको कारने ६ आसनी मॅजिकला जोरदार धडक दिली. यात इकोकार शेजारील ओहोळात जाऊन पडली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. रिक्षामधील ड्रायवर आणि प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.
इकोकार आंबोली हून सावंतवाडीच्या दिशेने येत होती. सहा आसनी रिक्षा सावंतवाडीहून आंबोलीच्या दिशेने जात होती. यावेळी करीवडे चर्च शेजारील वळणार इको कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. इको कार चालक ओव्हरटेक करत सुसाट येत होता अशी माहिती उपस्थित प्रवाशांनी दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही मोठी हानी झाली नाही. मात्र, रिक्षातील प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे.