१४६४ वाहनधारकांवर ई चलन केसेस दाखल

Edited by:
Published on: February 07, 2025 18:19 PM
views 189  views

सिंधुदुर्गनगरी : महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, कणकवली येथे कार्यरत असलेले  पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी ३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत महामार्गावर कर्तव्य करताना, वाहतूकीचे नियमन, अपघातग्रस्तांसाठी वेळोवेळी केलेली मदत, शाळा, महाविद्यालय, जनजागृतीपर प्रबोधन आदींसह कार्यक्रमात मार्गदर्शन, करुन पोलीस प्रशासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन केले. सन २०२५ अभियान कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक डॉ. सुरेश कुमार मेकला  यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा सत्कार करण्यात आला.  

गेली अनेक वर्षे महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, कणकवली येथे कार्यरत  नेमणूकीतील असलेले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल दत्ताराम वेंगुर्लेकर यांनी ३६ व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान २०२५ अंतर्गत महामार्गावर कर्तव्य करताना, वाहतूकीचे नियमन, अपघातग्रस्तांसाठी वेळोवेळी केलेली मदत, जनजागृतीपर प्रबोधन कार्यक्रम शाळा, महाविद्यालय आणि महामार्गावर उत्तम दर्जाचे काम केलेले असून, सन २०२४ सालात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणा-या वाहनधारकांवर त्यांनी सर्वाधिक १४६४ ई-चलन केसेसची कारवाई केलेली आहे.

तसेच ड्रंक अंण्ड ड्राईव्ह मधील ०६ वाहनधारकांवर कारवाई केल्या, या मध्ये सर्वांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी कणकवली व सावंतवाडी न्यायालयातून द्रव्यदंडाची शिक्षा सुनावली आहे.. तसेच त्यांच्या सर्वोत्कृष्ठ कामगिरीकरीता महाराष्ट्र राज्य पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख मा. अपर पोलीस महासंचालक यांचे कार्यालयाकडून त्यांची निवड करण्यात येवून त्यांना दिनांक ३१ जानेवारी २०२५ रोजी महामार्ग पोलीस मदत केंद्र पळस्पे,नवी मुंबई येथील आयोजित रस्ता सुरक्षा अभियान-२०२५ कार्यक्रमात महाराष्ट्र राज्यातील पोलीस वाहतूक विभागाचे प्रमुख अपर पोलीस महासंचालक मा. डॉ. श्री. सुरेश कुमार मेकला यांचे हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देवून त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. यावेळी महामार्ग सुरक्षा पथक, रायगड परिक्षेत्रातील पोलीस अधीक्षक मा. श्री. तानाजी चिखले, पोलीस उप अधीक्षक मा. श्रीमती ज्योत्स्ना रासम, म.सु.प., रत्नागिरी विभाग, पोलीस निरीक्षक मा. श्रीमती दिपाली जाधव यांच्या उपस्थितीत तसेच महामार्ग पोलीस केंद्र कसाल, जिल्हा - सिंधुदुर्ग, हातखंबा, चिपळूण, कशेडी, जिल्हा-रत्नागिरी, वाकण, महाड, बोरघाट, जिल्हा-रायगड, पळस्पे, नवीमुंबई या पोलीस मदत केंद्रांकडील प्रभारी पोलीस अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.

दरम्यान, प्रत्येक कामगिरीमध्ये महामार्ग पोलीस मदत केंद्र कसाल, कणकवली कडील प्रभारी पोलीस अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक  सुनिल हारूगडे यांचेही  वेंगुर्लेकर यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभलेले आहे.. वेंगुर्लेकर यांचे सर्व सहकारी कर्मचाऱ्यांकडून कौतुक करण्यात येत आहे. रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत २०२४ चा उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र कणकवली कसालचे पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिल वेंगुर्लेकर यांचा नवी मुंबई पळस्ते या ठिकणी वाहतूक पोलीस केंद्राचे,अप्पर पोलीस महासंचालक डॉ. सुरेश कुमार मेकला यांच्या हस्ते प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह  देऊन गौरविण्यात आले.