वेंगुर्ल्यात डोळ्यांच्या आजारावर त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवा : सुजाता पडवळ

Edited by: दिपेश परब
Published on: August 16, 2023 11:33 AM
views 154  views

वेंगुर्ला : राज्यात गेल्या काही दिवसांपासून डोळ्यांचा संसर्ग रोग झपाट्याने पसरत चालला असून आपल्या जिल्ह्याच्या लगतच्या जिल्ह्यातही याचा प्रसार वेगाने होत आहे. या रोगाचा वाढता प्रभाव पाहता आपल्या वेंगुर्ला तालुक्यातही हा संसर्गजन्य रोग फैलावण्याची शक्यता नाकारता येत नसून डोळ्यांच्या संसर्ग रोगावर त्वरित प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि गावागावात कँम्प च्या माध्यमातून जनजागृती करणे आवश्यक आहे.


तसेच यासाठी आवश्यक असणारी औषधे गोळ्यांचा साठा मुबलक प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्रात उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी तुळस गावातील सामाजिक कार्यकर्त्या सुजाता पडवळ यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी माईणकर- सामंत यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी भक्ती कवठणकर, विद्या आंगचेकर, कांचन राऊळ, प्रतिक्षा मेस्त्री आदी महिला उपस्थित होत्या.